Saturday, 12 September 2015

दिनविशेष - १३ सप्टेंबर २०१५

तिथी
 श्रावण अमावास्या (१२:११)
वार
 रविवार
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (१३:२१)
योग
 साध्य (१४:२०)
करण
 किंस्तुग्घ (२५:२९)

रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रप्रवेश

२६:१५ ला रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि चे नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: उत्तराफाल्गुनी

वाहन घोडा

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि चे नक्षत्र : उत्तराफाल्गुनी
चंद्र नक्षत्र: उत्तराफाल्गुनी
अंतर : १
१ ला ९ ने भागले असता बाकी राहते १. म्हणून वाहन घोडा आहे. याचाच अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना पर्वतांवर पाऊस पडेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री स्त्री

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = स्त्री नक्षत्र
दोन्ही स्त्री नक्षत्र आहेत. त्यामुळे रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना पर्जन्यवृष्टी होईल.

सूर्य-सूर्य

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 : वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 : पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 : पाऊस पडेल

रवि नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
चंद्र नक्षत्र : उत्तराफाल्गुनी = सूर्य नक्षत्र
दोन्हीही सूर्य नक्षत्रे आहेत. याचा अर्थ रवि उत्तराफाल्गुनी नक्षत्रात असताना वारा सुटून पाऊस पडेल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्याच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

दर्भाहरण


अन्वाधान

अग्नी हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ष्टिच्या च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.

खंडग्रास सूर्यग्रहण

आरंभ : १०: १२
मध्य : १२:२४
समाप्ती : १४:३६
हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने याचे वेधादि कोणतेही नियम पळू नयेत.

ग्रहण दिसणारे प्रदेश : दक्षिण आफ्रिका खंड, दक्षिण हिंदी महासागर, अंटार्क्टिका

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment