Friday, 21 October 2016

दिनविशेष - २२ ऑक्टोबर – २०१६




तिथी
 आश्विन कृष्ण ७ (१३:१०)  
वार
 शनिवार
नक्षत्र
 पुनर्वसु (२०:२७)
योग
 सिद्ध (२२:१९)
करण
 बालव (२४:४४)


कराष्टमी

आश्विन महिन्यांतील वद्य अष्टमी.  या दिवशीं कुमारिका गंगोदकानें भरलेला करा हातांत घेऊन देवीची पूजा करतात.  ही चाल काशीच्या बाजूस दृष्टीस पडते.
कराष्टमीपासून दिवाळीपर्यंतचे दिवस - यांत एक एक दिवा दररोज जास्त लावण्याची पद्धत आहे.

दम्पत्यष्टमी

पुत्रप्राप्तीच्या इच्छॆने स्त्री-पुरुषांना हे व्रत करता येते. हे व्रत करताना आश्‍विन कृष्ण अष्टमी दिवशी दर्भाचे शिव-पार्वती तयार करून त्यांची पंचोपचार पूजा करावी. जवळच ब्राह्मणपूजन करून त्यास दक्षिणा द्यावी. या व्रताने पुत्रप्राप्ती होते. हे व्रत चंद्रोदयव्यापिनी तिथीस करावे; म्हणून दोन दिवस तिथी असेल अगर दोन्ही दिवस (चंद्रोदयव्यापिनी ) नसेल तर दुसर्‍या दिवशी व्रत करावे.

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते.

वृश्चिकायन

२९:१५ ला रवि सायन वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे.

सौर हेमंत ऋतु प्रारंभ

सौर कालगणनेनुसार हेमंत ऋतु आरंभ होत आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment