तिथी
|
आश्विन शुक्ल ६ (१९:४२)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
जेष्ठा (१४:२५)
|
योग
|
सौभाग्य (१९:४६)
|
करण
|
कौलव (६:४०)
|
सरस्वती आवाहन
१४:२५ नंतर सरस्वती आवाहन
करावे.
आश्विन शुक्ल
सप्तमीपासून नवमीपर्यंत सरस्वतींचे शयनव्रत करतात. यासाठी सप्तमीला पुस्तकादिकांचे
पूजन करून सरस्वतीचे शयन करावे. स्वत: व्रतस्थ राहावे. पठण-पाठण, लेखन आदी गोष्टी बंद ठेवाव्या. सप्तमीपासून दशमीपर्यंत
पुस्तकादिकांची पूजा करावी. पूजेसाठी सरस्वतीची सुवर्णाची, पाषाणाची किंवा
चित्रयुक्त मूर्ती असावी. ती चतुर्भुजा, सर्वालंकारमंडित असावी.
तिच्या उजवीकडील दोन हातांत पुस्तक व रुद्राक्षमाला असावी आणि डावीकडील दोन हातांत
वीणा व कमंडलू असावा. अशा विराजमान-शोभायमान-मूर्तीचे ध्यान करावे.
बिल्वनिमंत्रण
आश्विन शुक्ल
षष्ठीला प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर देवीची पूजा करावी आणि ज्येष्ठा
नक्षत्र असेल तर त्यांच्या पूजेसाठी बिल्ववृक्षाला निमंत्रण करावे.
घबाड
१४:२५ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: हस्त
चंद्र
नक्षत्र : जेष्ठा
तिथी: ६ = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment