तिथी
|
आश्विन कृष्ण १२ (१६:१६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (२७:२९)
|
योग
|
ऐंद्र (१९:५१)
|
करण
|
गरज (२९:१६)
|
कृष्णद्वादशी / वासुदेव द्वादशी
या द्वादशीस
उपवास, वासुदेवाची पूजा करतात. या तिथीस 'वासुदेव द्वादशी' असेही नाव आहे.
गुरुद्वादशी
आश्विन कृष्ण
द्वादशीस 'गुरुद्वादशी' असे म्हणतात
दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय.
आश्विन वद्य
द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले
निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥
या दिवशी
दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची
पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.
नीरांजन द्वादशी
आश्विन कृष्ण
द्वादशीला प्रात:स्नानादि होताच काशाच्या चकचकीत ताम्हणात गंध, पुष्प, अक्षता, पाण्याने भरलेले भांडे इ. ठेवून मग त्या ताम्हणाने देव, ब्राह्मण, आपल्यापेक्षा वयाने मोठे, आई-वडील, तसेच घोडे इ.ना ओवाळावे.
लागोपाठ असे पाच दिवस केल्यास अक्षय फलप्राप्ती होते.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment