तिथी
|
आश्विन शुक्ल २ (१०:०५)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
स्वाती (२९:४१)
|
योग
|
वैधृति (१६:२३)
|
करण
|
तैतिल (२३:१९)
|
पुण्यप्रदा
आश्विन शुक्ल
द्वितीयेला कोणत्याही प्रकारचे दान दिले असता - दान देऊन व्रत केले असता- अनंत फल
मिळते.
रथोत्सव
आश्विन शुक्ल
द्वितीयेला हे व्रत करतात. या दिवशी कृष्ण, बलराम व सुभद्रा
यांच्या मूर्ती रथात बसवून त्यांची मिरवणूक काढतात. त्या दिवशी पुष्यनक्षत्र
असल्यास विशेष पुण्यप्रद मानतात.
मुस्लिम मोहरम मासारंभ
मुस्लीम कालगणनेच्या मोहरम
या महिन्याची सुरवात होत आहे.
हिजरी सन १४३८
हिजरी सन १४३८ आरंभ होत
आहे.
हा सन मुळचा अरबस्थानातला
आहे. मुसलमानांच्या अंमलापासून तो या देशात आला. मुसलमानी धर्म संस्थापक महंमद
पैगंबर हा १५ जुलै ६२२ रोजी, (श्रावण शुक्ल १ गुरवारी रात्री) मक्केहून मदिनेला
गेला. त्यावेळपासून हा सन सुरु झाला. याला रात्रीपासून सुरवात झाली. याच्या वाराचा
आरंभ संध्याकाळपासून होतो. (उदाहरणार्थ आपल्या गुरुवारच्या संध्याकाळपासून ते
शुक्रवार संध्याकाळपर्यंत मुसलमानी पद्धतीत शुक्रवार असतो.)
शुक्ल पक्षात चंद्र दर्शन
झाल्यानंतरच्या रात्रीपासून नवीन महिन्याला सुरवात होते. म्हणजे यांचे महिने केवळ
चांद्र आहेत. या महिन्यातील दिवसांना पहिला चंद्र, दुसरा चंद्र अशी नवे आहेत.
यांच्या बारा महिन्यांची
नावे अशी:
१)
मोहरम
|
२)
सप्फर
|
३)
राबिलावल
|
४)
रबिलाखर
|
५)
जमादिलावल
|
६)
जमादिलाखर
|
७)
रज्जब
|
८)
साबान
|
९)
रमजान
|
१०) सव्वाल
|
११) जिल्काद
|
१२) जिल्हेज
|
यमघंट
२९:४१ नंतर सोमवारी विशाखा
नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
http://rprachi.com/
No comments:
Post a Comment